पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम त्यांच्या ‘जॉय ऑफ लाइफ, या योजनेअंतर्गत गेले कित्येक वर्ष गरजवंतांना मदतीचा हात देत आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी मागण्यांमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. ही गोष्ट महेश प्रोफेशनल फोरमपर्यंत पोहोचली आणि वारकरी रूपात असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करण्याचा योग साधण्यात आला.
श्री क्षेत्र आळंदी येथील विठ्ठल महाराज देशमुख धर्मशाळा, ज्ञानेश्वरी वारकरी धर्मशाळा, आणि मुंबई डबेवाले धर्मशाळा येथील वारकरी विद्यार्थ्यांना माधुकरी गहू, तांदूळ, डाळ, पोहे आणि तेल या रूपांमध्ये देण्यात आली. वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल महेश प्रोफेशनल फोरमने वारकरी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
“खरा देणारा निसर्ग असतो आपण फक्त मध्यस्थी असतो म्हणून सर्वांनी निसर्गाचे उपकृत व्हावे आणि एक झाड लावून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी” असा संदेश डॉ. संदीप बाहेती यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिला. डॉक्टर मनोज राका यांनी झाडे जोपासण्याचा संदेश दिला.
या उपक्रमाचे नियोजन श्रीकुमार मालू गोविंद सोनी, मनोज मालपानी, संदीप बाहेती आणि जॉय ऑफ लाईफचे सहकारी यांनी केले.
डॉ. संदीप बाहेती व डॉ. मनोज रका यांच्या हस्ते माधुकरी संतोष महाराज सांगळे, नारायण महाराज खंदारे, व महेश महराज सानप यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने स्वीकारली.