मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहराची कार्यकारणी गठीत

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहराची कार्यकारणी गठीत

चिंचवड : येथील दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळा येथे दोन फेब्रुवारी रोजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिपंरी चिंचवड शहर कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्यकारणी सदस्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक रमेश हांडे उपस्थित होते तसेच पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते तसेच मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे हे उपस्थित होते.

प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पिपंरी चिंचवड शहर संघटन पुनर्बांधणीची प्रक्रिया जोमाने सुरू करून शहराचे नवनिर्वाचित महानगर अध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना पदी नियुक्त करून कार्यकारणी गठित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. अनेक शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रासाठी समाजउपयोगी काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शहरामध्ये होत आहे. तसेच कामगारांचे हित आणि शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने यावेळी संभाजी ब्रिगेड करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच यापुढे संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रत्येक विभागात शाखा निर्माण करण्याचे आश्वासन सतीश काळे यांच्याकडून देण्यात आले आहे.

यावेळी प्रदेश संघटक रमेश हांडे बोलताना म्हणाले की संभाजी ब्रिगेड नवी दिशा नवा विचार घेऊन आता मैदानात उतरली आहे. देशात नव्हे तर जगात मराठा ही बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी अशी आशा व्यक्त केली यापुढे तरुणांनी उद्योग-व्यवसाययातून आपली प्रगती साधावी अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडच्या शहर कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे, संजय जाधव, सचिव श्रीमंगेश चव्हाण, उपाध्यक्ष नितीन जाधव, सतिश कदम, महेश कांबळे, सुभाष जाधव, संघटक राजेंद्र चव्हाण, संतोष सुर्यवंशी, बाळासाहेब वाघमारे, विनोद घोडके, गजानन वाघमोडे या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन सतिश काळे यांनी केले होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने वैभव जाधव, रशीद सय्यद, भैय्यासाहेब गजधने, जयेश दाभाडे, नकुल भोईर यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Actions

Selected media actions