
पिंपरी, ता. 16 (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्यामध्ये ई क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत सर्वात जास्त कोरोना बाधित रूग्ण असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत एकुण 48 कोरोना विषाणू सकारात्मक रूग्ण सापडले असून त्यापैकी 12 रूग्ण उपचारानंतर कोरोना मुक्त झाले आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये
अ प्रभाग (रूग्ण संख्या - ०१)
प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर).
ब प्रभाग (रूग्ण संख्या - ००)
प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी).
क प्रभाग (रूग्ण संख्या - ०9)
प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा).
ड प्रभाग (रूग्ण संख्या - ००)
प्रभाग क्रमांक २५ (वाकड), प्रभाग क्रमांक २६ (पिंपळेनिलख), प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) आणि प्रभाग क्रमांक २९ (पिंपळेगुरव)
ई प्रभाग (रूग्ण संख्या - 15)
निवडणूक प्रभाग क्रमांक ३ (चऱ्होली), प्रभाग क्रमांक ४ (दिघी), प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) आणि प्रभाग क्रमांक ७ (भोसरी)
फ प्रभाग (रूग्ण संख्या - ०२)
प्रभाग क्रमांक १ (चिखली), प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर), प्रभाग क्रमांक १२ (तळवडे-रुपीनगर) आणि प्रभाग क्रमांक १३ (यमुनागनर,सेक्टर क्रमांक २२).
ग प्रभाग (रूग्ण संख्या - ०४)
प्रभाग क्रमांक २१ (पिंपरीगाव), प्रभाग क्रमांक २३ (थेरगाव), प्रभाग क्रमांक २४ (गणेशनगर) आणि प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी).
ह प्रभाग (रूग्ण संख्या - ०४)
प्रभाग क्रमांक २० (संत तुकारामनगर-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३० (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी)आणि प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी).
- HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.
- Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी
- PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक
- HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे
- Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र