![मनसेच्या तक्रारीची एक तासात महापालिकेने घेतली दखल मनसेच्या तक्रारीची एक तासात महापालिकेने घेतली दखल ](https://lokmarathi.in/wp-content/uploads/cwv-webp-images/2020/06/IMG-20200617-WA0025-1024x768.jpg.webp)
चिंचवड : प्रभाग क्रमांक १७ मधील नवशांती निकेतन सोसायटी, मिरॅकल हाऊसिंग सोसायटी व चैतन्य पार्क सोसायटी परिसरात पडलेला कचरा उचलण्याची तक्रार महाराष्ट्र नवननिर्माण विद्यार्थी सेनेचे चिंचवड विधानसभा (उपविभाग) अध्यक्ष प्रविण माळी यांनी महापालिकेकडे करताच आरोग्य विभागाने एक तासाच्या आत कचरा उचलून नेत परिसराची साफसफाई केली.
![मनसेच्या तक्रारीची एक तासात महापालिकेने घेतली दखल मनसेच्या तक्रारीची एक तासात महापालिकेने घेतली दखल ](https://lokmarathi.in/wp-content/uploads/cwv-webp-images/2020/06/IMG-20200617-WA0027-1024x768.jpg.webp)
या ठिकाणी पाच-सहा दिवसांपासून कचरा पडल्याने परिसर अस्वच्छता झाला होता. याबाबत नागरिकांनी प्रविण माळी यांच्याकडे तक्रार केली. माळी यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवताच करताच महापालिकेने तातडीने तीन गाड्या पाठवून कचरा उचलून नेला.