पिंपरी : पिंपळे निलख मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर नारायण साठे (वय 78 वर्षे) यांचे आज गुरुवारी (दि. 20 फेब्रुवारी) ह्रदय विकाराने निधन झाले.
त्यांच्या मागे, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. मुरलीधर साठे हे पिंपळे निलख उत्सव कमिटीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते आणि छत्रपती शिवाजी मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होत. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांचे ते वडील होत.
मुरलीधर साठे यांचा अंत्यविधी उद्या शुक्रवारी (दि. 21) रोजी सकाळी 9 वाजता पिंपळे निलख मधील दादा साठे घाट स्मशानभुमी, मुळा नदी किनारी होणार आहे.