नेहरूनगरमधील नूराणी मशिद रस्त्याचा मार्ग मोकळा

नेहरूनगरमधील नूराणी मशिद रस्त्याचा मार्ग मोकळा

पिंपरी (लोकमराठी) : नेहरूनगर येथील (सि.स.नं. 5016, 5015) नूराणी मशिद रस्ता जमीन वादात अडकला होता. मात्र, राजेंद्र गोळे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, पुणे यांनी नूराणी मशिद तर्फे दाद मागणाऱ्या अपिलदाराच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे मशिद रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत जिल्हा अधिक्षक पिठासनासमोर 2017 मध्ये अपिल करण्यात आले होते.

अपिल निर्णयात म्हटल्याप्रमाणे, नूराणी मशिद तर्फे याकूब सुलतान शेख व अकबर सुलतान शेख (दोघेही रा. स्वप्ननगरी, उद्यमनगर, पिंपरी), शहाजहान मेहबूब सय्यद (रा. स.न. 102, नूराणी मशिद, पिंपरी) यांनी खलीलखान मुनीरखान पठाण (रा. नेहरूनगर, पिंपरी), अभिलाषा इफ्रा डेव्हलपर्स तर्फे धर्मेंद्र पटेल (रा. 102, नूरमोहल्ला, नेहरूनगर, पिंपरी) व विशेष जिल्हा निरिक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी क्र. 3 पिंपरी चिंचवड द्वारा नगर भूमापन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांच्या विरोधात जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख पिठासनासमोर अपिल दाखल करण्यात आले होते. जिल्हा अधिक्षकांनी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर 24 जून 2019 रोजी याबाबत आपला निकाल जाहीर करत खलीलखान पठाण यांचे त्यांच्या हिश्यापुरते क्षेत्रावर नोंद करून उर्वरित क्षेत्र मूळ जागाधारकाला कायम ठेण्याचे नगर भूमापन अधिकारी पिंपरी चिंचवड यांना सांगितले आहे.

पिंपरी पोलिसांकडे तक्रार अर्ज
दरम्यान, या निर्णयाची कार्यवाहीसाठी नगर भूमापन अधिकारी शिवाजी भोसले
स्थळपहाणी करून मशिद जवळ राहणाऱ्या लोकांचे जबाब घेण्यासाठी बुधवारी (ता. 20) आले होते. त्यावेळी अर्जदारांना काहींनी शिवीगाळ करत धमकी दिली असल्याची तक्रार रहीमखान पठाण, मबारक मुल्ला, एकबाल शेख, याकुब शेख, जमीत शेख यांनी संत तुकारामनगर पोलिस चौकीत दिली आहे.

तक्रार अर्जात म्हटले आहे की, गेली 35 वर्षे मशिदीच्या वहिवाटीचा वापरत असलेला रस्ता दोन वर्षापुर्वी बंद केला आहे. मात्र, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांनी या जमीन वादातील 26 चौ.मी. जागा कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

Actions

Selected media actions