पिंपरी येथील खराळवाडीमध्ये बांधवांसाठी रोजा-ए- इफ्तार पार्टीचे आयोजन

पिंपरी, दि.२१ (लोकमराठी) – महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया वाहतुक आघाडी यांच्या वतीने बुधवारी खराळवाडीतील जामा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजन केले होते. रमजान महिन्याच्या उपवासा निमित्त फळ आहाराचा आस्वाद सर्वांनी येथे घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरात विविध धर्मातील नागरिक आपले सण, उत्सव साजरे करतात. व त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे ही ते आयोजन करत असतात. या सण, उत्सवात व कार्यक्रमांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक कोणताही भेदभाव न करता त्यामध्ये सहभागी होत असतात.

या इफ्तार पार्टी वेळी सिमाताई रामदास आठवले यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया(अ) वाहतुक आघाडीच्या वतीने अजीजभाई शेख यांनी केला.

यावेळी सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी -चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश महिला अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे,मा.नगरसेवक हमीदभाई शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, बघतो रिक्षावाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ . केशव क्षीरसागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतुक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शशिकांत बेल्हेकर,कामगार नेते इरफान सय्यद, आरपीआयचे नेते सिकंदर सुरवंशी, आरपीआय नेते सचिन वाघमारे,पुणे जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष यादव हरणे, पुणे शहर वाहतूक आघाडी वैभव पवार, पिंपरी चिंचवड शहर वाहतूक आघाडी सदाशिव तळेकर, युवानेते सचिन वाघमारे, देहूरोड शहराध्यक्ष वाहतूक आघाडी गांधी खेड, तालुका अध्यक्ष अभिमान दिसले, भाजपचे दक्षिण भारतीय नागरिक संघाचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले भजपा अल्पसंख्याक पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष फारुक इनामदार, दुर्गा ब्रिगेड संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर हातगाडी पथारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इलेक्ट्रॉनिक मीडिया साम टीव्ही प्रतिनिधी गोपाल मोटघरे, आपला आवाज टिव्ही चैनल प्रतिनिधी समीर शेख, अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, मराठी पत्रकार परिषदेचे पिं चिं. शहर अध्यक्ष प्रवीण शिर्के, चौथा स्तंभ पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विकास कडलं, अखिल मराठी पत्रकार संघाचे पिंपरी- चिंचवड अध्यक्ष दादराव आढाव, सुनील उर्फ बाबू कांबळे विनोद चांदमारे, संतोष जराड गणेश शिंदे, मारुती बाणेवार दिलीप देहाडे, सुरज साळवे, शैलेश जाधव सहीनाद कुरणे, अमोल डंबाळे विश्वजीत पाटील, भगवान सिंह बापू गायकवाड, राजेश तेलंगी, विशाल कदम, भगवान सिंह, मुंबई अध्यक्ष महबूब पठाण या आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन दिलीप देहाडे यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक खराळवाडी जामा मज्जित जमातीच्यासर्व मुस्लिम बांधवांच्या संकल्पनेतून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.