लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी उचलत असलेल्या रावेत बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याचा उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे रावेत बंधाऱ्यात मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. नदीतील जलपर्णी काढून शहराला पूर्णपणे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा. अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका रावेत बंधा-यातून पाणी उचलते. या बंधा-यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याच्या उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आहे. पाणी पिण्यायोग्य नाही.
- Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
- KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक
- महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव
यामुळे शहरातील लाखो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करावे. रावेत बंधारा परिसरातील मैला मिश्रित पाणी बंद करावे. मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. बंधाऱ्यातील जलपर्णी काढावी. शहराला पूर्णपणे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे.