मुस्लिम समाज दफनभूमीची आरक्षित जागा पिंपरी चिंचवड महापालिकेने ताब्यात घ्यावी

मुस्लिम समाज दफनभूमीची आरक्षित जागा पिंपरी चिंचवड महापालिकेने ताब्यात घ्यावी

पिंपरी, ता २२ : पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्यात मुस्लिम समाजाला काळेवाडी, थेरगाव, वाकड अपवाद सोडता, दफनभूमीसाठी जागा आरक्षित केली गेली आहे. मात्र, आरक्षित क्षेत्र भूमाफियांकडून हडप केले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून हे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे.

इरफान शेख हे लोकमराठी न्यूजशी बोलताना म्हणाले की, आज आपण पाहत आहोत, अनेक भूखंड, मग ते आरक्षित असो अथवा ब्ल्यू लाईन असो, भूमाफियांकडून ते कमी दरामध्ये घेतले जात आहेत. हे भूमाफिया ती जागा जे कामगार वर्ग परराज्यांतून आपली उपजीविका शोधत शहरात आले आहेत, त्यांना विकतात. काही काळात या आरक्षित भूखंडांवर घरे बांधून हे आरक्षण संपविण्याचा डाव केला जातो. अशा परिस्थितीत मुस्लिम समाज दफनभूमीसाठी जे भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत, ते लवकरात लवकर ताब्यात घेणे गरजेचे झाले आहे.

आरक्षित भूखंडाचा तपशील खालीलप्रमाणे :

गावआरक्षण क्र.प्रयोजन सर्व्हे/गट नं. एकुण क्षेत्र (हेक्टर) मनपा ताब्यात
भोसरी३१ अदफनभूमी५०९ पै-५१० पै१. ००१. ००
चऱ्होली२/६३दफनभूमी१०१५, १०१७,१०१९ ते १०२१२. ०००.००
दिघी २/१२८दफनभूमी६६ पै०. ८००. ००
चिखली१/९८दफनभूमी१६३६ पै१. ७५०.००
पुनावळे४/७५दफनभूमी३ पै१. ०००.००
चिंचवड२५५दफनभूमी२५७, २५८ १. ६६१. ६६
तळवडे१/४८दफनभूमी २४ पै१. ००१. ००

इरफान शेख पुढे म्हणाले की, काळेवाडी, थेरगाव, वाकड दफनभूमीसाठी कुठेही आरक्षित भूखंड नाही. परंतू, सर्व्हे नंबर ४, सेक्टर ३४ थेरगाव हद्दीत ग्राउंडसाठी क्षेत्र आरक्षित होते. सदर भूखंडावर आमदार लक्षण जगताप यांच्या सहकार्याने आम्ही ठराव संमत केला. मात्र, सदर भूखंड हस्तांतरीत करता येत नाही. कारण, सदर दावा उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अशी माहिती आम्हास दिली गेली. मात्र, प्राधिकरण अधिकारात असलेले क्षेत्र हे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचे आदेश आले आहेत. या विषयी पेठ १ ते २९ स्कॅनिंग झाले आहे. या पुढे पेठ ४२ पर्यंतचा विषय हा प्रस्तावित आहे. याबाबत आम्ही आयुक्तांसमोर पाठवला आहे. आयुक्तांनी पुढील कारवाई करून भूखंड ताब्यात घेणे संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील कारवाई करण्याचे आदेश नगर रचना विकास विभागास दिले आहे. आम्हास खात्री आहे की, उशीर होणार पण महापालिकेकडून मुस्लिम समाजाला न्याय मिळणार आणि काळेवाडी, थेरगाव, वाकड नागरिकांसाठी दफनभूमीची जागा मिळणार.

मुस्लिम समाजाने जे आरक्षित भूखंड आहेत, ते ताब्यात घेणे कामी आपले योगदान द्यावे. कोरोना काळात मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा कमी असल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. समाज एकवटला आहे, माझी समाजाच्या प्रमुख मंडळींना नम्र विनंती आहे की, त्यांनी आरक्षित भूखंड ताब्यात घेणे संदर्भात आंदोलन चालू करावे. पिंपरी चिंचवड हद्दीत असलेले सर्व आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचा संकल्प करावा. असे झाले तर या समाजाला यापुढे दफनसाठी त्रास होणार नाही. असे इरफान शेख म्हणाले.