विवाहपूर्व समुपदेशनाने लग्न हे “बंधन” न राहता, बहरण होईल

विवाहपूर्व समुपदेशनाने लग्न हे

विवाहपूर्व समुपदेशनाने लग्न हे
साधना मेघ:श्याम सवाने

सद्यस्तिथीत घटस्फोटाचे वाढते प्रमाण एकूणच पाहिले तर, “घटस्फोट घेणे” हा कलंक (stigma) आहे, असे मानणे कमी झालेले आहे. ब्रम्हदेवाने स्वर्गात साता जन्माच्या गाठी मारल्या आहेत म्हणून तुमचे विवाह होतात. ह्या कल्पना आता दिसेनाश्या झाल्या आहेत.

त्याचे कारण म्हणजे समाजाची बदलती जीवनशैली आणि स्व च्या अस्तित्वासाठी असणारी धडपड त्यामुळे स्वाभाविकच मुले -मुली स्वतंत्र विचारांना अधिक प्राध्यान देऊन, जेव्हा एकमेकांचे पटत नसेल, दोघेही आपल्या जडणघडणीला, एकमेकांच्या घरातील वातावरणाला जुळवून घेऊ शकत नसतील तर ते एकमेकांपासून मुक्त होण्याचा निर्णय व्यावहारिकरित्या (practically) घेतात.

काही जोडप्यांन बाबतीत, लग्नापूर्वी -लग्न ठरल्यावर भरपूर आकर्षण, उत्सुकता, आनंद , संवाद असतो, आणि लग्ना नंतर काही महिन्यातच जबाबदाऱ्या, हरवलेला संवाद, तणाव, रोजचे कलह इत्यादी बघायला मिळते, म्हणून मुला-मुलींनी लग्नानंतरची परिस्तिथी ही थोडी फार बदलणार आहे.पुरुषप्रधान संस्कृतीतील तडजोड ही फक्त मुलींची नसून, 50-50 टक्के दोन्ही पक्षाच्या कुटुंबांची आणि मुला-मुलींची असणार आहे, हे गृहीत धरून, आपापसात मोकळेपणाने चर्चा करून लग्न करण्याचे ठरवावे, यासाठी विवाहपूर्व समुपदेशनाचा फायदा नक्कीच होईल, आणि लग्न हे फक्त “बंधन” किंवा फक्त, “इव्हेंट” न राहता, बहरण होईल आणि ते नात फुलवेल.