पिंपरी चिंचवड (लोकमराठी) : प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बुधवारी (ता. ११) शासनाच्या जिल्हा रुग्णालयाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
हर्षल कदम (वय ९) हा मुलगा एका दुर्मिळ आजाराने बहुविकलांग झाला आहे. मात्र, जिल्हा रूग्णालयाने त्याला ५४ टक्के अपंगत्वाचा दाखला दिला. त्यामुळे त्या शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. या मुलावर झालेल्या अन्यायाबाबत जाब विचारण्यासाठी व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शहरातील विकलांग आंदोलन करणार आहेत. असे संघटनेचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले.