
पिंपरी (लोकमराठी) : भोसरीत राहणाऱ्या व इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या परिसरातील १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. भोसरी येथील राहणारा हा विक्रेता महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. तो किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा करायचा.
पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, भोसरी परिसरातील एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले असून तो इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करत होता. यामुळे वेगवेगळ्या भागातील ऐकून १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. कनकवले यांनी दिली आहे. यात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांचा समावेश आहे.
परिसरातील नानेकरवाडी, खराबवाडी आणि मेंदनकरवाडी येथील व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, परिसरात सर्वे सुरू केला असून आत्ता पर्यंत कोणी करोना पॉजिटिव्ह आढळला नाही अशी माहिती देखील डॉ. कनकवले यांनी दिली आहे.
- संवैधानिक अधिकारांसोबत कर्तव्यांचेही पालन करा; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
- बलशाली भारत घडवण्याच्या राष्ट्रकार्यात योगदान द्या; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
- चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचा व्यावसायासाठी युवकांना ‘आधार’
- पिंपरी चिंचवड शहर होणार राममय; २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराममंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा
- शेवटच्या घटकांपर्यंत भाजपाने साजरी केली दिवाळी अन् भाऊबीज!