दिघीत आढळला दुर्मीळ पांढरा तस्कर साप (व्हिडीओ)

दिघीत आढळला दुर्मीळ पांढरा तस्कर साप (व्हिडीओ)

पिंपरी : दिघीतील वाळके मळा येथे शुक्रवारी (ता. १) दुर्मिळ पांढरा (अल्बीनो) साप आढळला. सर्पमित्र अमर गोडांबे यांनी या सापाला सुरक्षितरित्या पकडुन याबाबतची माहीती वनविभाग अधिकारी वनपाल अनिल राठोड यांना देऊन या सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडुन दिले.

वन्यजीव सप्ताहच्या पहील्याच दिवशी वाळके मळा येथे विजय लांडगे यांना हा साप दिसला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र अमर गोडांबे यांना माहीती दिली असता, सर्पमित्रांनी तेथे धाव घेऊन हा साप सुरक्षितरित्या पकडला. तीन फुट लांबीचा पुर्ण वाढ झालेला तस्कर जातीचा अल्बीनो हा साप पहिल्यांदा आढळुन आल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. हा साप जंगलात सोडत असताना सर्पमित्र दिपक बनसोडे, अलताफ सय्यद, विक्रम भोसले आणि अभिषेक फुलारी उपस्थित होते.

रंगद्रव्यांच्या आभावाने अल्बीनो

पांढरा तस्कर जातीचा साप हा बिनविषारी आहे. तो अत्यंत दुर्मिळ आहे पांठरा / भगवा रंगाचा हा साप असतो. याचे डोळे देखिल लाल रंगाचे असतात. मात्र, दिघीत वाळके मळा सापडलेला हा साप रंग विरहीत होता. त्यामुळे तो अल्बीनो मनुन ओळखला गेला, एखाद्या जिवाच्या गुनसुत्रांमधे रंगद्रव्यांच्या आभाव निर्माण झाला की, तो रंगविरहीत जन्मतो. अशा सापांना अल्बीनो मानले जाते. असे सर्पमित्र विक्रम भोसले यांनी सांगितले.