
पुणे (लोकमराठी): एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना मनेसकडून मात्र जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन करण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडताना विकृत पोस्ट केली म्हणून मारले असेल तर चांगलंच केले असे म्हटले आहे.
रुपाली ठोंबरे यांनी म्हटले की, “अरे काहीही पोस्ट, कमेंट..काही करणार का. सोशल मीडिया आहे आपल्या विकृतीचे साधन नाही हो. चांगले घ्या की सोशलमधून. बरी विकृती करायला हात, मन धजावते कसे. मंत्री असो, सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी… कमेंट विकृत करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे. सोशल मीडियावर ही विकृती संपवली पाहिजे,”
- PIMPRI : ट्रेडमार्क कायद्याचा भंग; दोघांविरोधात गुन्हा दाखल
- Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘उद्योजकता’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
- Hadapsar : सी.ए.टी.सी. 707 कॅम्प एन.सी.सी स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय
- SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
- यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे
