संभाजी ब्रिगेड शहराध्यक्षपदी सतिश काळे यांची निवड

संभाजी ब्रिगेड शहराध्यक्षपदी सतिश काळे यांची निवड
  • पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेडला मिळाला आक्रमक चेहरा

पिंपरी : वाशीम येथे मंगळवारी (दि. ४ जानेवारी) संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणी संचालक मंडळाची वार्षिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी सर्वानुमते स़ंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सतिश काळे यांची पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

सतिश काळे संभाजी ब्रिगेडचे गेल्या पंधरा वर्षांपासून पासून काम करत आहेत. काळे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

सतिश काळे यांची पिंपरी चिंचवड शहरात पुरोगामी विचारांचा लढाऊ व आक्रमक मावळा म्हणून ओळख आहे. काळे यांनी आजपर्यंत विविध सामाजिक विषयांवर शेकडोंच्या वर अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. यामध्ये मराठा आरक्षणासाठी किल्ले शिवनेरी वरील हेलीकॉप्टर फोडल्याचे आंदोलन, संभाजी बिडी चे नाव बदलने, मराठा आरक्षणासाठी अनेक वेळा रस्ता रोको, उपोषणे, धरणे आंदोलने, तसेच शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव, व शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान मिळावे यासाठी मुंडंन आंदोलन, तसेच मराठा आरक्षणासह राज्यातील सर्वसामान्यांच्या विविध सामाजिक प्रश्नांसाठी काळे यांनी अनेक आंदोलने केली आहेत.

काळे यांनी मराठा आरक्षणासाठी पुणे कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंग वरुन उडी मारुन आत्मबलिदान करण्याचा इशारा दिला होता त्यावेळी काळे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहा केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दोन वर्षे झाले सतिश काळे शासनाशी संघर्ष करीत आहेत रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार काळे यांनी केलेला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लेखन गिरीश कुबेर यांनी त्यांच्या रेनिसांन्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकींग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल बदनामी कारक लिखाण केल्याप्रकरणी पाच डिसेंबर रोजी नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले होते.

तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून सतत रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स़ंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सतिश काळे यांना पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.