
पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील चौधरी सिद्धेश (४० मीटर हर्डल), गायकवाड धैर्यशील (उंच उडी) व लव्हे देवश्री (४०० मीटर) धावणे या क्रीडा प्रकारात मेंगलोर विद्यापीठ, मेंगलोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या आंतर विभागीय मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केलेले आहे. तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या पुरुष संघाने मैदानी स्पर्धेत विजेतेपद संपादन केले.
या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडूरंग लोहोटे व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे