अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पिंपरी : निगडी प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये सोमवारी (ता. ३ जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच ‘बालिका दिवस’ साजरा करण्यात आला.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट, सामाजिक कार्य तसेच शिक्षणाचे महत्त्व शाळेतील शिक्षकांनी आपल्या भाषणातून दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिली महिला शिक्षिका आहेत तसेच समाजसेविका सुद्धा आहेत.

समाजातील मुलींचे स्थान अधिक चांगले होण्यासाठी व सामाजिक भेदभाव कमी होण्यासाठी त्याचीच आठवण व स्मरण होण्यासाठी आजचा दिवस ‘बालिका दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या कार्यक्रमास वालचंद संचेती यांचे सहकार्य लाभले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांच्याकडून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.