शैला पाटील यांची राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा संघटकपदी निवड

शैला पाटील यांची राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा संघटकपदी निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हा संघटक पदी काळेवाडीतील शैला चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत नुकतेच निवडीचे पत्र विभागाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते पाटील यांना देण्यात आले.

या संदर्भात लोकमराठीशी बोलताना शैला पाटील म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली असून चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कलाकारांचे अनेक प्रश्न प्रकाशात येत नाहीत, कोरोना महामारी काळात लॉकडाऊन असल्याने या क्षेत्रातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याबाबत पक्षाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असून पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.