सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो – डॉ. श्रीपाल सबनीस

सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो - डॉ. श्रीपाल सबनीस

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पुणे: “सेवेला जात-धर्म, पक्ष-पंथ नसतो, सेवा हे समर्पण असून डाव्या किंवा उजव्या विचारसरणीच्या शिक्क्याने सेवाभाव बाधीत करणे अयोग्य असते” असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे व ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नामदेव कांबळे यांना भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन व मातंग साहित्य परिषदेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सबनीस बोलत होते.

त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. श्रीपाल यांच्या हस्ते मानपत्र देवून गौरवण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यातील ३३ साहित्यिकांच्या साहित्यकृतीला ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वांड:मय पुरस्काराने’ मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

त्याप्रसंगी डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, “आता प्रतिभावंत लेखक, कलावंतांनी सत्यनिष्ठ आणि विवेकनिष्ठ समाजाची उभारणी करावी. ‘उजवे-डावे’ ही भानगड बरी नव्हे, माणूसपण महत्वाचे आहे”

दोन्ही पुरस्काराचे वितरण प्रसंगी व्यासपीठावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. गजानन एकबोटे, डॉ. श्रीपाल सबनीस, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री नामदेव कांबळे, सिनेटर सदस्य राजेश पांडे, डॉ. देविदास वायदंडे, विवेक बुचडे, स्वागताध्यक्ष डॉ. अंबादास सगट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते.

त्यावेळी डॉ. एकबोटे यांचेही भाषण झाले, ते म्हणाले, “पद्मश्री गिरीश प्रभुणे व पद्मश्री नामदेव कांबळे हे आजच्या काळातील सामाजिक संत आहेत, त्यांच्या सामाजिक, साहित्य आणि समाजाची बांधणी करण्याच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे, हे खरंच अभिमानास्पद आहे”

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड़मय पुरस्कारार्थींमध्ये मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. बळीराम गायकवाड, समरसता साहित्य परिषदेचे रविंद्र गोळे, दादासाहेब सोनवणे, डॉ. उज्वला हातागळे, डॉ. सुशील चिमोरे, डॉ. बालाजी समुखराव, अ‍ॅड. श्रीधर कसबेकर, संपत जाधव, प्रा. वैजनाथ सुरनर, सतिश नाईकवाडे आदींसह ३४ साहित्यकृतींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांनी केले, सूत्रसंचालन मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. विजय रोडे यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड.मय पुरस्कारासाठी विविध साहित्यिकांकडून मागवण्यात आलेल्या साहित्यकृतीची निवड ही प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाड.मय पुरस्काराची निवड समिती गटीत करुन निवड समितीने सर्वांनुमते निवड केलेल्या साहित्यिक व साहित्यकृतीची यादी पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र.साहित्यीकाचे नावसाहित्यकृतीचे नाववाड.मय प्रकार प्रकाशकाचे नावपत्ता
बाबुराव गायकवाडचऱ्हाटकथा संग्रहमंजुल प्रकाशन, पुणेधारवाड, कर्नाटक
बाबासाहेब सकटेआक्रोशकथा संग्रह सिधी प्रकाशन,कोल्हापूरगोवा
प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकरआळ आणि काळकथा संग्रहगुरुमाऊली प्रकाशन, उदगीरउदगीर, लातूर
बाळासाहेब भडकवाड (संपा.)अण्णा भाऊ साठे यांच्या कथेचे वारसदारप्रातिनिधीक कथासंग्रहअभिनंदन प्रकाशन,कोल्हापूरमंचर, ता. आंबेगाव, पुणे
श्रीराम दुर्गे जागल्याकादंबरीसायन पब्लिकेशन प्रा. लिमिटेड, पुणेखेड, चिपळून, रत्नागिरी
जयवंत अवघडे हौसाकादंबरीस्नेहवर्धन प्रकाशन,पुणेपुणे
छाया बेले फरफटकादंबरीयशोदीप प्रकाशन, पुणेनांदेड
ब. बा. कोटंबे कदाचितकादंबरीप्रतिमा पब्लिकेशन, पुणेपरभणी
बाळ लक्ष्मण भारस्कर युगार्तकादंबरीस्वलिहा पब्लिकेशन, पुणेपुणे
१०किरण मोरे (चव्हाण)सत्यशोध… एक काव्यपुष्पकाव्यसंग्रहएस. पी. मोरे, गोंदियागोंदिया
११दीपक लोंढेमृत्यूच्या गर्द छायेत जगायला शिकवणारा काव्यदीपकाव्यसंग्रहहृदय प्रकाशन, कोल्हापूरमिरज, सांगली
१२टी. एस. क्षीरसागर गावरान बोरंकाव्यसंग्रहध्वजभारती प्रकाशन,उस्मानाबादसोलापूर
१३सतीश नाईकवाडे शालेय गाणे/बडबड गाणेबाल कविता संग्रहगुरु माऊली प्रकाशन, उदगीरउदगीर, लातुर
१४संतोष कांबळेतुकोबाच्या कुळाचा वंशगझल संग्रहऋषी प्रकाशन, पुणेमालेगाव
१५संपत जाधवलोकशाहीर
नाटकसानिध्य पब्लिकेशन पुणे पुणे
१६जालिंदर कांबळेस्वातंत्र्य क्रांतीचे जनक लहुजी वस्तादचरित्रमातंग चेतना परिषद पुणेसांगवी, पुणे
१७डॉ. शरद गायकवाड प्रबोधन चळवळीतील मातंगाची शौर्यगाथाचरित्रनाग नालंदा प्रकाशन, सांगलीकोल्हापूर
१८अॅड. श्रीधर कसबेकर नरेंद्र मोदी अॅन आयकॉन ऑफ द न्यू येरा (इंग्रजी)चरित्रपुणे
१९प्रदीपराव साने दोरखंडआत्मचरित्र/आत्मकथनअक्षय प्रकाशन, रत्नागीरीबावडा, कोल्हापूर
२०मुक्ता खोतकरमुक्तांगणआत्मचरित्र/आत्मकथनकैलास पब्लिकेशन औरंगाबादसिडको, औरंगाबाद
२१दादासाहेब सोनावणेशून्यातून शोषिताकडेआत्मचरित्र/आत्मकथनअण्णा भाऊ साठे स्मारक संस्थापुणे
२२डॉ. बळीराम गायकवाडAnna Bahu Sathe Fakiraभाषांतरमुंबई
२३सुमंत गायकवाड (संपा.) साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेषांक २०१९-२०२०विशेषांकप्रबोधन प्रकाशन, नांदेडमाजलगाव
२४डॉ सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ. बालाजी सुमखराव क्रांतिगुरु लहुजी साळवेविशेषांकअरुणा प्रकाशन, लातूर
उदगीर, लातुर
२५डॉ.सतेज दणाणेभटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथनेसंशोधनात्मक लेखनमंजूर प्रकाशन पुणे
नातेपुते
२६डॉ. उज्ज्वला हातागळेअण्णा भाऊ साठे लिखित स्त्री संघर्षगाथासंशोधनात्मक लेखनस्नेहवर्धन प्रकाशन पुणेपुणे
२७डॉ. अंबादास सगटमातंग आणि सांस्कृतिक राष्ट्रसंघ भारतसंशोधनात्मक लेखनभारतीय विचार साधना पुणेकन्नड, औरंगाबाद
२८डॉ. कमल दणाणेबाबुराव गायकवाड यांचे कादंबरी लेखनसंशोधनात्मक लेखनमंजुळ प्रकाशन पुणे
नातेपुते
२९डॉ. गिरिजाप्रसाद (संजय) क्षिरसागर वाघ्या मुरुळी यांच्या गीतांचा अभ्याससंशोधनात्मक लेखन (लोक साहित्य)सक्सेस पब्लिकेशन, पुणेआळेफाटा, ता. जुन्नर, पुणे
३०दिगंबर घंटेवाडमातंग ऋषीचरित्रनांदेड
३१रविंद्र गोळे (संपा.) सामाजिक न्यायाचा योद्धा अण्णा भाऊ साठेविशेषांकसाप्ताहिक विवेक, मुंबईमुंबई
३२कबीर दासफकिराचा सत्त्वशोधगौरव ग्रंथतापी, गुजरात
३३डॉ. लक्ष्मण साठेअण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचे पैलूसंशोधनात्मक ग्रंथशब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा, सोलापूरकोल्हापूर
३४प्रा. वैजनाथ सुरनरहोलार समाज परिवर्तनाची दिशाप्रबोधनात्मक लेखन अरुणा प्रकाशन, लातुरलातुर