पिंपरी : भाजप नेते व माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भटक्या विमुक्त जाती-जमाती सांगवी मंडल अध्यक्ष प्रकाश सुखलाल लोहार व सामाजिक कार्यकर्त्या भारती लोहार यांच्या वतीने अन्नदान व काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विजयनगरमधील श्री स्वामी समर्थ मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले. काळेवाडी-विजयनगर येथील प्रकाश लोहार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यावेळी माजी स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, भाजप उपशहराध्यक्ष धर्मा पवार, सप्तश्रृंगी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आर. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप आंब्रे, शांताराम पाटील, रमेश काळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, शिवाजी पाटील, गणेश लोहार, अरविंद लोहार, बाळासाहेब पाटील, प्रदीप राणे, सामाजिक कार्यकर्त्या नंदा कापुरे, पुष्पा कुंजीर, हिरामण मनोरे, अलका भोसले, सुनिता खराडे, अपर्णा म्हात्रे, उज्वला थॉमस, आशा चव्हाण, मोहिनी पाटील, सुनिता शिर्के, याचिका लोहार, समीर कैजलगीकर, सुरेखा कुंभार, दिपाली जाधव, पुष्पा राठोड, भाग्यश्री रोहिटे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन गौरव लोहार व चंदू पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर यांनी केले. यावेळी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.