महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी (उत्तर विभाग) नितीन शिंदे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी पराग कुंकूलोळ 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी (उत्तर विभाग) नितीन शिंदे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी पराग कुंकूलोळ 
नितीन शिंदे व पराग कुंकूलोळ

पिंपरी (लोकमराठी) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्षपदी नितीन शिंदे तर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी पराग कुंकूलोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार राज्य सचिव विश्वास आरोटे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर नवीन कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली आहे.

कार्यकारणी पुढीलप्रमाणे

उपाध्यक्ष शिवप्रसाद डांगे, सचिव / संपर्कप्रमुख जमीर सय्यद, कार्याध्यक्ष मिलिंद संधान, संघटक विजय जगदाळे, खजिनदार शशिकांत जाधव, सहसचिव औदुंबर पाडळे, प्रसिद्धीप्रमुख संजय बेंडे, कार्यकारणी सदस्य बेलाजी पात्रे, प्रमोद सस्ते, सुनील बेनके तर सल्लागार ऍड संजय माने या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी संघाचे सदस्य महादेव मासाळ, संदीप सोनार, ज्ञानेश्वर भंडारे, अतुल क्षीरसागर, महेंद्र भिंगरदिवे, योगेश घाडगे, बलभीम भोसले, शहाजी लाखे, प्रसाद वडघुले, सागर झगडे आदी उपस्थित होते.

Actions

Selected media actions