सोलापूर ते मुंबई पायी वारी करणाऱ्या शिवसैनिकाचा निगडीत सन्मान

सोलापूर ते मुंबई पायी वारी करणाऱ्या शिवसैनिकाचा निगडीत सन्मान

पिंपरी : शिवसेना ( Shivsena) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांना समर्थन देण्यासाठी सोलापुरातील कट्टर शिवसैनिक उत्तम शिंदे यांनी संकल्प करत पायी वारी करण्याचे ठरवले. ते सोलापुरातून मुंबईतील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मृतीस्थळ शिवतिर्थ येथे निघाले आहे. त्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमान झाले. त्यांचा शिवसेनेच्या वतीने निगडी येथे सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर, विभाग प्रमुख गोरख पाटील, मातोश्री संस्थेचे शहराध्यक्ष गणेश पाडुळे, युवासेना आयटी सेलचे रविकिरण घटकार, शाखाप्रमुख दत्ता गिरी आदी उपस्थित होते.