श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानने केला सामुदायिक तुळसी विवाह संपन्न

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानने केला सामुदायिक तुळसी विवाह संपन्न

चिंचवड, (लोकमराठी) : शिवतेजनगर येथील श्री स्वामी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर येथे सामुदायिक तुलसी विवाह करण्यात आला.

याप्रसंगी परिसरातील सुमारे २० कुटूंबांनी आपल्या घरातील तुलसी सजवून आणल्या होत्या. तुलसी विवाह श्री निर्मल गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला, हा विवाह सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली होती.

विवाह लागल्यानंतर फटाके फोडण्यात आले तसेच सर्वांना लाडूचा प्रसाद देण्यात आला. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, संतोष शेळके, मंगेश पाटील, अशोक खडके, कैलास मुळे, अर्चना तोंडकर, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले.

ADVERTISEMENT
Advertisement