सासू व पत्नीची हत्या करणाऱ्या घरजावयाला पोलिसांनी केली अटक

सासू व पत्नीची हत्या करणाऱ्या घरजावयाला पोलिसांनी केली अटक

नवी दिल्ली : घरजावई झाल्याचे सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच घरजावयाने पत्नी आणि सासूचा खून केला. त्याने गोळी झाडल्यामुळे पत्नी व सासूचा जागेवरच मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. बाबा असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरीदास नगर येथे आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यांकडेच आरोपी राहत होता. त्यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू-सासरे टोमणे मारत असत. दररोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला.

विशेष म्हणजे आरोपीने स्वत: फोन करुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी बाबाला अटक केली आहे.

Actions

Selected media actions