स्वाईन फ्यूचे तातडीने मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी

स्वाईन फ्यूचे तातडीने मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी

पिंपरी, ता. २५ : शहरामध्ये वाढत्या स्वाईन फ्यूच्या पार्श्वभूमिवर तातडीने मोफत स्वाईन फ्यू लसीचे लसीकरण करून घ्यावे. अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी मुख्यमंत्री, आरोग्य विभाग व महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

याबाबत तापकीर यांनी पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लू रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच रूग्ण पण दगावत आहेत. यासोबत कोविड-१९ आणि डेंग्यू रूग्णांची भर आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपूरी पडत आहे. स्वाईन फ्लूचे वाढते रूग्ण पाहता स्वाईन फ्लूचे युद्ध पातळीवर मोफत लसीकरण होणे गरजेचे आहे. तरी तातडीने या विषयामध्ये लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, लोकांच्या आरोग्याचा योग्य तो विचार करून तात्काळ पाऊले उचलावित. असे तापकीर यांनी ई-मेलमध्ये नमुद केले आहे.