रहाटणीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारणीचे काम सुरू

रहाटणीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारणीचे काम सुरू
  • नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते यांच्या पाठपुराव्याला यश | पेढे वाटून शिवभक्तांनी साजरा केला आनंदोत्सव

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : रहाटणीगाव (प्रभाग क्रमांक २७) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामाची वर्क ऑर्डर शुक्रवारी (ता. २२) मिळाली आहे. नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते यांच्या अखंड पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नगरसेवक चंद्रकांत बारकु नखाते यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी ठराव मंजुर करून घेतला. तर शुक्रवारी (ता. २२) अखेर पुतळा उभारणीचे काम सुरू करण्याचे आदेश मिळाले. हि वार्ता आण्णांमार्फत समजताच, शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानिमित्त रहाटणी गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नगरसेवक नखाते, सुरेश तात्या गोडांबे, वसंत नखाते, श्रीराम नखाते, रविंद्र धुमाळ, शुभम चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिववंदना, शिवगर्जना तसेच आतिशबाजी करत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला

त्यावेळी प्रमोद नढे, राजु नढे, शुभम चंद्रकांत नखाते युवा मंच व पदाधिकारी, पै. ॠषिकेश नखाते, पै. अमोल नखाते, पै. अनिल गोडांबे, सौरभ जाधव, महाराष्ट्र कबड्डी संघाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पेढे वाटुन शिवभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.