नऊ महिने बंद असलेले पथदिवे नऊ दिवसात सुरू

नऊ महिने बंद असलेले पथदिवे नऊ दिवसात सुरू
  • सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, ता. 18 : काळेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (एम एम चौक) ते एम्पायर इस्टेट पुल दरम्यानचे अनेक पथदिवे व हायमस्ट दिवे सुमारे नऊ महिने बंद होते. मात्र, काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या नऊ दिवसांच्या पाठपुराव्यानंतर हे पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकाशाने रस्ते उजाळले आहेत.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा 45 मीटर रूंदीचा बिआरटी मार्ग दळवळणाच्या दष्टीने अत्यंत महात्वाचा मार्ग बनला असून भोसरी, मोशी, चिखली, आळंदी, चाकण, मोरवाडी तसेच काळेवाडी, रहाटणी, वाकड, हिंजवडी, माण, थेरगाव, चिंचवडगाव आदी भागाला जोरणारा प्रमुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरील एम एम कॅालेज चौक ते पवना नदीवरील पुलादरम्यान अनेक पथदिवे व हायमस्ट दिवे सुमारे नऊ महिने बंद होते.

त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे सामाज्र पसरत होते. परिसरातील नागरिक रात्री वेळी फेरफटका व शतपावलीसाठी येतात. मात्र, रस्त्यांवरील अंधारामुळे अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत होता. तसेच या रस्त्यावर अवजड वाहने पार्क केलेली असतात. त्यामध्ये व त्यांच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन गैरप्रकार चालतात. या सर्व बाबींचा विचार करून सोमनाथ तापकीर यांनी महापालिका विद्युत विभागाला निवेदन देऊन त्याचा साधारण नऊ दिवस पाठपुरावा केला. तापकीर यांच्या तक्रारीची विद्युत विभागाने दखल घेत बंद असलेले दिवे सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


या रस्त्यावरील बंद पथदिव्यांबात सोमनाथ तापकीर यांची तक्रार प्राप्त झाली होती. या मार्गावरील दिवे सुरू करण्यात आले असून काही तांत्रिक कारणामुळे दिवे बंद असतात. बंद दिव्याबाबत तक्रार आल्यास आम्ही तातडीने दखल घेत असतो.

  • सागर देवकाते, अभियंता, पिंपरी चिंचवड, महापालिका विद्युत विभाग