पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना मातृशोक

पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना मातृशोक

अहमदनगर : चांदे बुद्रुक (ता. कर्जत) येथील सुपुत्र व मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्या आई कमल बापुराव वाघमारे (वय ६२) यांचे निधन झाले. पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २८ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, तीन मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत. दरम्यान चांदे बुद्रुक येथे बुधवारी (ता. ६ जानेवारी) दशक्रिया विधी होणार आहे.

Actions

Selected media actions