वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानावेळी पोलीसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असून हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली नढे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी स्वाती शिंदे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा निर्मला खैरे, शबाना शेख, महिला शहर उपाध्यक्षा आशा भोसले, रंजना सौदेकर आदी उपस्थित होत्या.
Pimpri Chinchwad Police Commissioner यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) व संतश्...