Tag: Alandi

Alandi Crime : कार भाड्याने घेत फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
ताज्या घडामोडी, क्राईम

Alandi Crime : कार भाड्याने घेत फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि ११ (प्रतिनिधी) : दोन कार भाड्याने घेऊन त्या परत न देता तसेच भाड्याचे पैसे न देता एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथे ही घटना घडली. सुमीत सुनील कवडे (वय २८, रा. कोरेगाव पार्क, पुणे), ओंकार शशिकांत ढावरे (वय ३२, रा. यमुनानगर, निगडी), फयाज फक्रुद्दीन शेख (वय ३९, रा. विद्यानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रोहित महादेव गिरी (वय २८, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुमीत, ओंकार आणि फिर्यादी यांच्यामध्ये एका मोटारीला दरमहा ७३ हजार रुपये; तर दुसऱ्या मोटारीला दरमहा ४८ हजार ६०० रुपये भाडे देण्याचे ठरले. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी आगाऊ रक्कमही दिली. त्यानंतर रोहित यांच्या संमतीशिवाय एक मोटार फयाज शेख याला परस्पर विक्री करण्यासाठी दिली; तर...
वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
पिंपरी चिंचवड

वारकरी लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी पिंपरी : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानावेळी पोलीसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असून हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे. काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली नढे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी स्वाती शिंदे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा निर्मला खैरे, शबाना शेख, महिला शहर उपाध्यक्षा आशा भोसले, रंजना सौदेकर आदी उपस्थित होत्या. Pimpri Chinchwad Police Commissioner यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) व संतश्...