Tag: ANS Maharashtra

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा – लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले
महाराष्ट्र

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा – लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले

ठाणे : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर अतिशय जबाबदारीने करायला हवा. त्याचे जेवढे फायदे आहेत तर तेवढाच त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो, याचे भान ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जबाबदारीने या सोशल मीडियाचे तंत्र अवगत करून घेणे गरजेचे आहे. तसेच त्या माध्यमातून पुरोगामी विचार प्रभावीपणे समाजामध्ये घेऊन जायचे आहे. असे प्रतिपादन लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले यांनी राज्य सोशल मीडिया तर्फे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी काढले. या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शाखेतील पदाधिकारी आणि नवीन कार्यकर्ते यांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्य सोशल मीडिया चे सदस्य श्री प्रसाद खुळे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घेऊन कुमुद बंगल्...
वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी
महाराष्ट्र, मोठी बातमी

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी

किनवली (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचे काम विद्यार्थीदशेतच केले तर विज्ञाननिष्ठ पिढी घडवायला जास्त प्रभावी ठरेल होते. असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सांस्कृतिक विभाग समितीचे सदस्य राजू कोळी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्त आयोजित किनवली येथील महाविद्यालयात बोलत होते. २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक सी व्ही रमण यांनी आपले शोध याच दिवशी १९२८ ला जगापुढे मांडलेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध शाळा कॉलेजेस मध्ये जावून या विज्ञान दिनाच्या निमित्ताने सातत्याने प...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप
मोठी बातमी, महाराष्ट्र

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप

ठाणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे वाटप डोंबिवलीत ठिक-ठिकाणी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसी येथील शिवाई बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करून छत्रपती शिवारायांची माहिती देण्यात आली. एमआयडीसीतील रिक्षा स्टँड वरील रिक्षाचालकांसह अनेकांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. डोंबिवली येथील लोढा हेवन ग्रीन पार्क सोसायटी मधील मुलांनासुद्धा या पुस्तकाचे वाटप करून व समाजातील लहान थोरांपर्यंत शिवाजी महाराजांचे खरे चारित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवरायांच...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद
महाराष्ट्र

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

लोकमराठी न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली (प.) येथील जोंधळे हायस्कूल येथे रविवारी (ता. १३) महिलांसाठी एक दिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर, मुरबाड, अशा विविध ठिकाणाहून जवळपास ३५ हून अधिक महिलांनी प्रशिक्षणार्थी म्हणुन सहभाग नोंदवत उदंड प्रतिसाद दिला. बुवा-बापू ,महाराज, तांत्रिक-मांत्रिक व पूजा-पाठ कर्मकांडाच्या माध्यमातून स्त्रियाच जास्त शोषणाला बळी पडतात. समाजातील स्त्रियांना प्रशिक्षित करून त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जोडून घेऊन, त्यांच्यामार्फत इतर महिलांना जागृत करण्याचे काम करावे, समाज प्रबोधन करावे. हा या शिबिराचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यक...