इंदापूरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथील राधिका सेवा संस्थेमार्फत ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अरविंद विष्णू वाघ यांच्या नेतृत्वाखाली २००५ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आपर्यंत या संस्थेच्या वतीने सात रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे.
ही संस्था इंदापूर शहरात रुग्णवाहिकेची मोफत सेवा पुरविते तर इंदापूर तालुका परिसरात अल्पदरात रुग्णवाहिका उपलब्ध होते. कोविड काळात त्यांचा उपयोग झाला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
...