Tag: Bhishma pitamha

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…
विशेष लेख, मोठी बातमी

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…

विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ विचारवंत भीष्मांना एक त्रासदायक वर मिळालेला होता. त्यांना आधीचे जन्म आठवत असत. भीष्मांचे एकूण ७३ पूनर्जन्म महाभारतात आहेत. माझा स्वतःचा पुनर्जन्मावर विश्वास नाही पण तूर्त आपण महाभारताच्या दृष्टीनंच महाभारताकडे बघू. तर भीष्म शरपंजरी पडले, म्हणजे टोचणाऱ्या बाणांवर झोपले. महाभारतातलं युद्धं तर १८ दिवसात संपलं पण भीष्मांना तब्बल ५८ दिवस शरपंजरी पडावं लागलं. सक्ती कोणाचीच नव्हती. भीष्मांना इच्छामरणाचं वरदान होतं.वाट्टेल तेव्हा ते प्राण सोडू शकत होते. पण शरपंजरी पडून भीष्मांनी शिक्षा भोगली. भीष्मांनी स्वतः दिलेली कारणं दोन. एक तर ५८ दिवसांनी उत्तरायण लागणार होतं. उत्तरायणात मरणं धर्माच्या दृष्टीनं उचित. दुसरं कारण फार वेगळं होतं. भीष्मांना स्वतःच्या एका जन्मातल्या पापाची शिक्षा स्वतःहोऊन भोगायची होती. ७३ पैकी एका जन्मात भीष्म राजकुमार होते. एकदा ज...