Tag: Breaking news

Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस
राष्ट्रीय, मोठी बातमी

Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस

Images Source : Google मुंबई, ता. 15 : आयटी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कंपनीकडून केवळ बोनस आणि प्रोत्साहनच मिळत नाही, तर काहीवेळा त्यांना त्यांच्या योगदानासाठी इक्विटी शेअर्सच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील मिळते. देशातील आघाडीच्या आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) असेच पाऊल उचलले आहे आणि आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना 5.11 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. हे वाटप इन्फोसिसच्या दोन कर्मचारी संबंधित योजनांतर्गत करण्यात आले आहे आणि हे वाटप गेल्या आठवड्यात 12 मे रोजी झाले. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना शेअर्स का दिले?इन्फोसिसने हे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत कारण काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल बक्षीस द्यायचे होते. याशिवाय कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मालकी हक्क थोडे वाढले पाहिजेत, अशीही इन्फोसिसची इच्छा आहे. इन्फोसिसने 14 मे रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त 
राजकारण, मोठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झा...
दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झालाय. अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. इंजिनीअर पदावर कार्यरत अ...
अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील
महाराष्ट्र, मोठी बातमी

अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : गुजरात (Gujarat) निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र (Maharashtra) कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्ली...
हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन
महाराष्ट्र, राजकारण

हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

मुंबई, ता २३ : हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी ...
कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश
महाराष्ट्र, मोठी बातमी

कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई दि ८ :विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीर स्वास्थाला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करू नये,असे निर्देश सहकार व पणन मंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे,महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार,सहायक निबंधक अहमदनगर शरीफ शेख ,सहायक निबंधक सोलापूर श्री.माने, एपीएमसी चे संचालक अशोक वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई उपसभापती धनंजय वाडकर, सचिव संदीप देशमुख, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील,माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा प...
एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील

आज ३६ गाड्या धावल्या | १५०० कर्मचारी कामावर परतले एसटी महामंडाळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती मुंबई, दि. १२ नोव्हेंबर २०२१ : संप मागे घेण्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून आज विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला....