Tag: breakingnews

PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या
विशेष लेख

PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या

लोकमराठी न्यूज नेटवर्क : विश्वकर्मा योजनेला १७ सप्टेंबर सुरुवात झाली आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑगस्ट २०२३ रोजी मंजुरी दिली असून योजनेसाठी १३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना २०२३-२०२४ ते या पाच वर्षांसाठी असेल. या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे. शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत. या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार? पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल...