#COVID-19: कर्जतमध्ये १३ आरोपीसह ४२ जण कोरोना बाधित
अहमदनगर : कर्जत तालुक्यात बुधवारी ४२ रूग्ण कोरोना (covid-19) सापडले आहेत. त्यामध्ये सबजेलमधील १३ आरोपींचा समावेश आहे. रविवारी (ता. २७) कर्जत पोलिस ठाण्यातील सात पोलिस तर राशीन पोलिस ठाण्यातील एक पोलिस कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याअनुषंगाने सबजेलमधील १९ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा आरोपी कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, कर्जत तालुक्यात एकुण १३३३ कोरोना रूग्णांपैकी १०६२ रूग्ण बरे झाले असून २४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रूग्णांचा गावानुसार तपशील खालीलप्रमाणे :
1.कर्जत-04
2.दुरगाव-03
3.कुळधरण - 01
4.चापडगाव - 02
5. खांडवी- 01
6.नेटकेवाडी - 01
7.निमगाव गांगरडा-02
8.अळसूनदे-04
9.मिरजगाव-02
11.चिंचोली काळदात-02
12.राशीन-01
13.बहिरोबावाडी-02
14.रुईगव्हान-01
15.सितपु...