Tag: crime

PIMPRI CHINCHWAD : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अंमली विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या; १ गावठी पिस्टल आणि १ जीवंत काडतुस केले जप्त
क्राईम

PIMPRI CHINCHWAD : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अंमली विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या; १ गावठी पिस्टल आणि १ जीवंत काडतुस केले जप्त

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पोलीस (PCPC) रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड अंमली विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्हेगाराकडुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल आणि ०१ जीवंत काडतुस पथकाने जप्त केले आहे. या गुन्हेगारावर १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन तडीपारीची कारवाई देखील त्याच्यावर करण्यात आली आहे. विशाल शहाजी कसबे असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आधिकारी यांच्या सुचना प्रमाणे अंमली विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवार (ता.७) रोजी पेट्रोलींग करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार संदिप पाटील व अशोक गारगोटे यांना माहीती मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार विशाल कसबे हा वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळाखडक येथील पाण्याच्या टाकी जवळ थांबलेला असुन त्याच्या जवळ पिस्टल आहे. मिळालेल...