Tag: Delhi flood

Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली

नवी दिल्ली : दिल्लीतील यमुना नदीचे पाणी सतत विकराल रूप धारण करित आहे. 46 वर्षांचा विक्रम मोडत पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. राजधानीतील सर्व सखल भाग पाण्यात बुडाला आहे. कश्मीरी गेट आयएसबीटीमध्ये अनेक फूट पाणी आहे. नेहमी गजबजणारा रिंगरोड सुनसान आहे. रिंगरोडवर यमुना नदीच्या पाण्यात उसळणाऱ्या लाटा आपल्याला समुद्राची आठवण करून देत आहेत. राजघाटापासून चांदगी राम आखाड्यापर्यंत ते पाण्यात बुडाले आहेत. दिल्लीतील सर्वात मोठे स्मशान बोधघाट बंद करण्यात आले आहे. त्यात अनेक फूट पाणी साचले आहे. https://youtu.be/lLG_PRuuFgw केंद्रीय जल आयोगानुसार हरियाणा बॅरेजमधून येणाऱ्या पाण्याची पातळी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे. दिल्लीचा लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय. दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीमुळे यमुनेच्या आसपासच्या भागातील शाळा रविवारपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. दिल्लीच्...