आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा
नारायणगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा आहे, म्हटलं तर समाधानाचा, अगदी दसरा - दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे. त्यामुळे 'याचसाठी केला होता अट्टाहास' अशी भावना सर्वांच्या मनात आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच हे संपूर्ण यश तमाम बैलगाडा मालक, शौकिनांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
https://youtu.be/r_HajS04WlI
बैलगाडा शर्यतींवर लवकरच आपण चित्रपट बनवणार असल्याचे सांगून त्याची तयारी आधीपासूनच सुरू झाली असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. बैलगाडा मालकांचे कष्ट, त्यांचं बैलांशी असलेलं नातं या सगळ्याचा उहापोह यात असेल त्याचबरोबर एक आंतररा...