Tag: Dr Babasaheb Ambedkar

नाच गाण्याऐवजी वाचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेणे गरजेचे
पिंपरी चिंचवड

नाच गाण्याऐवजी वाचनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेणे गरजेचे

चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान अभ्यासपूर्ण लिहिले म्हणून देश सुरक्षित आहे व पुढेही राहणार आहे. त्यामुळे आपण लिहिणे, वाचणे गरजेचे असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला पुस्तक रूपाने बघणं आवश्यक आहे. नाच गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती होणार नाही म्हणून बाबासाहेबांना डोक्यात घेणे गरजेचे आहे. अशा आशयांचे मनोगत विविध मान्यवरांनी चिंचवडगाव येथे भिम महोत्सवात व्यक्त केले. प्रबुद्ध संघाच्या वतीने चिंचवडगाव भिम महोत्सव २०२२ उत्साहात साजरा करण्यात आला. गाडगेबाबा चौक केशवनगर येथे सकाळी ८ वाजता प्रबुद्ध संघाचे अध्यक्ष किशोर सोनवणे व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते पंचशील झेंडा रोहन करण्यात आला. यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमोद साळवी, चंद्रकांत लोंढे, अल्पना गोडबोले, अर्चना गावडे, निशांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम ...
प्रबुद्ध संघातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सामाजिक

प्रबुद्ध संघातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चिंचवडगाव : येथील प्रबुद्ध संघाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सभासदांनी पुष्प अर्पण केले व मेनबती लाऊन अभिवादन केले. सामुदायिक बुद्ध वंदन घेण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या समतामूलक विचारांमुळे आज भारतात लोकशाही टिकून आहे. वेगवेगळ्या जाती जमाती, वेगवेगळ्या भाषा असून ही भारताची लोकशाही जगात मोठी असून ती टिकून आहे. ती केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळेच. असं मनोगत डॉ धर्मेंद्र रामटेके यांनी व्यक्त केले. प्रस्तावना व आभारप्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले. कार्यक्रमात सहभागी कार्यकारिणी सदस्य प्रतिमा साळवी, राजू वासनिक, दिंगबर घोडके व प्रबुद्ध संघाचे सर्व सभासद उपस्थित होते. ...