Tag: Dr.dypatilpimpri

डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
पिंपरी चिंचवड

डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

पिंपरी, दि.३१ (लोकमराठी) - डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठ ,पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद , हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , पिंपरी पुणे येथे दि. १ फेब्रुवारी (बुधवार) रोजी ते २० फेब्रुवारी (सोमवार) २०२३ पर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ स.९ ते दु. ४ वा. पर्यंत असेल. रविवारी सुट्टी राहील. कृपया रुग्णांनी याची नोंद घ्यावी. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून संधिवात, आमवात, पक्षघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे,- पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा -सल्ला मार्गदर्शन , बालपक्षघात, पोटदुखी, जन्तांचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे- भूक न लागणे , शय्यामूत्रता (अंथरुणात लघ...