सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या रडारवर – अॅड. प्रकाश आंबेडकर
पिंपरी : केंद्र सरकार (Central government) विरोधकांना विविध केंद्रीय यंत्रणेद्वारे संपविण्याचा प्रयत्न करीत असून, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या (Enforcement directorate) रडारवर आहेत. अशावेळी ते स्वतःला वाचवतात कि, जनतेला हा मोठा प्रश्न आहे. असे मत बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी येथे केले.
पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता मुस्लिम समाजाच्या स्थानिक प्रश्नांविषयी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शहरातील मुस्लिम बांधवांशी मोकळा संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अॅड. आंबेडकरांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केल्याने अतिशय कमी वेळेमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला....