चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन
मुंबई : हरियाणातील मुलगा व त्याची फेसबुकवरील राजस्थानातील मैत्रीण दोघेही जानेवारी महिन्यापासून गायब आहेत. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मुलीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याने ते दोघेही मुंबईत असल्याची शक्यता आहे. या दोघांना शोधण्यास मदत करण्याचे पालकांनी आवाहन केले आहे.
राजेश चुघ (रा. घर नंबर 512/ 21, गल्ली नंबर 1, नरेंद्रनगर, सोनीपत हरियाणा) यांचा मुलगा सौरभ चुघ (वय 18, उंची 5 फूट 11 इंच) हा घरातून 29 जानेवारी 2021 पासून गायब आहे. याप्रकरणी सोनीपत सिव्हिल लाईन पोलिसमध्ये फिर्याद दिली आहे.
तर या मुलाची फेसबुकवर नंदिनी या एका मुलीशी मैत्री झाली. ती राजस्थानची राहणारी असून तीही त्याच दिवसापासून तिच्या घरातून गायब झाली आहे. नंदिनीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याचे तिच्या मेल्सवरून निश्चित होते आहे. ही दोन्ही मुले मुंबईत आहे असे समजते. सौरभचा मोबाईल नंबर 82...