Tag: Hadapsar

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.
शैक्षणिक

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.

हडपसर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे,एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे- २८ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० मार्च २०२५ रोजी जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रो.डॉ. संगीता अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप हे होते. सत्र-१ ले पहिल्या सत्रात प्रो.डॉ. संगीता अहिवळे यांनी ‘लिंगभाव व जैविक वास्तव’ या विषयावर उपस्थित महाविद्यालयातील राष्ट्रीय एक दिवसीय मार्गदर्शन केले. आपल्या विषयाला अनुसुरून त्यांनी जैविक दृष्ट्या लिंग व सामजिक दृष्ट्या लिंगभाव ही संकल्पना सविस्तर सांगून विज्ञा...
HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘भारतातील संशोधनाच्या संधी’ विषयावर कार्यशाळा संपन्न 
शैक्षणिक

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘भारतातील संशोधनाच्या संधी’ विषयावर कार्यशाळा संपन्न

हडपसर | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील लक्ष्मीबाई भावराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन (CIII) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील संशोधनाच्या संधी या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विवेक पवार (सीईओ, पुणे) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे. डॉ. अशोक नगरकर(डी.आर.डी.ओ. एच.ई.एम.आर.एल. पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पेटंट रजिस्टर करताना तत्काळ रजिस्टर केली पाहिजे. घेतली पाहिजे. फाईल कशी करायची यासंदर्भात माहिती दिली. तसेच कॉपीराईट संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शि...
HADAPSAR : राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करतात – डॉ. सदानंद भोसले
शैक्षणिक

HADAPSAR : राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करतात – डॉ. सदानंद भोसले

हडपसर, ९ मार्च २०२५ (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवशीय “युवक - युवती उन्नयनीकरण कार्यशाळेचा समारोप समारंभ संपन्न झाला. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी महानगरामधून गावामध्ये जातात. आणि त्या ठिकाणी निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करतात. निस्वार्थ भावनेने गावामध्ये केलेले कार्य पुढे आयुष्यभर समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. असे मत डॉ.सदानंद भोसले यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुल...
HADAPSAR : एस. एम. जोशी महाविद्यालयात “एसएम टेक्नो वेंझा 2K25″ स्पर्धेचे आयोजन
शैक्षणिक

HADAPSAR : एस. एम. जोशी महाविद्यालयात “एसएम टेक्नो वेंझा 2K25″ स्पर्धेचे आयोजन

हडपसर, ८ मार्च २०२५ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स आणि अँप्लिकेशन विभागातर्फे एसएम टेक्नो वेंझा 2K25 या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. आणि आपली कौशल्ये सादर केली. कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेश उमाप (प्रादेशिक संचालक, महाराष्ट्र सेंटर ऑफ एन्ट्रेप्रेनियरशिप) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. (SM Joshi College) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी अध्यक्षपद भूषवले. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, रंगोली स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, मॉडेल व प्रकल्प स्पर्धा, खाद्य महोत्सव, मेमरी गेम्स, ट्रेझर हंट अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या हौशेने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी...
HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न 
शैक्षणिक

HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न

हडपसर, ४ मार्च २०२५ (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष तांबे व डॉ.संदीप वाकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.संतोष तांबे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची आणि क्रांतिकारकांची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी असून त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. आजच्या तरुणांनी आपला इतिहास वाचन लेखनाच्या माध्यमातू आत्मसात केला पाहिजे. आपल्या इतिहासामध्ये झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, ताराबा...
HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नवलेखक कार्यशाळा संपन्न 
शैक्षणिक

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नवलेखक कार्यशाळा संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नवलेखक कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दिनेश पवार व प्रा.किशोर मुठेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.दिनेश पवार म्हणाले की, आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली जाते. वाचन लेखनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करता येते. आजच्या तरुणांनी वाऱ्याच्या वेगाने ग्रंथ वाचन आणि लेखन केले पाहिजे. ग्रंथातील शब्दांमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी हाती मोबाईल घेण्याऐवजी पुस्तक घ्यावे अ...
Hadapsar : एस. एम. जोशी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न 
शैक्षणिक

Hadapsar : एस. एम. जोशी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये मराठी विभाग, मास कम्युनिकेशन ॲंड जर्नालिझम विभाग (Mass Communication and Journalism) व वैश्विक कला पर्यावरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' समारंभानिमित्त विद्यार्थी कवी संमेलन, गीतगायन, भित्तिपत्रक उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बालाजी सूर्यवंशी (सुप्रसिध्द कवी, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर) यांनी विविध गीतकवितांचे सादरीकरण करुन, मराठी भाषेचा गौरव करीत, मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास सांगितला. भाषा हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करावे. असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध कविता आणि लेख या 'युवास्पंदन' भित्तीपत्रिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्...
Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात 
शैक्षणिक

Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात

हडपसर, दि. ४ फेब्रुवारी (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी, विद्यार्थी तक्रार निवारण समिती आणि महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाणे हळदी - कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानवर्धिनी शाळेच्या सचिव सोनल चेतन दादा तुपे आणि सामाजिक कार्यकर्त्या व अँटी रॅगिंग विद्यार्थी तक्रार समिती सदस्य मनीषा प्रसाद राऊत उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना सोनल चेतन तुपे यांनी महिला प्राध्यापिकांना हळदी - कुमकुम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या आयुष्यामध्ये शिस्त कशी महत्त्वाचे आहे या संदर्भात अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन सोनल चेतन तुपे यांनी केले. तसेच मनिषा प्रसाद राऊत यांनी सर्व महिला प्राध्यापिकांना हळदी - कुमकुम दिनाच्या शुभेच्छा देत, स्काय गोल्ड यांच्या कडून देण्यात आलेल्या गिफ्टचे वाटप केले. कार्यक्रम...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी 
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी

हडपसर, 23 सप्टेंबर 2024 (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी कॉलेज व साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी व 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हडपसरचे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय चेअरमन चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे व महाविद्यालय विकास समिती सदस्य अमर (आबा) तुपे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, कर्मवीर संवादमाला, ...
छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर
पुणे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर

राहुरी, दि.२० (लोकमराठी) - छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला. छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत वस्ताद अमित गुंडाकुश यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. वाजता मराठी साहित्नय संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घट...