Tag: Hinjewadi

Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस
राष्ट्रीय, मोठी बातमी

Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस

Images Source : Google मुंबई, ता. 15 : आयटी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कंपनीकडून केवळ बोनस आणि प्रोत्साहनच मिळत नाही, तर काहीवेळा त्यांना त्यांच्या योगदानासाठी इक्विटी शेअर्सच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील मिळते. देशातील आघाडीच्या आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) असेच पाऊल उचलले आहे आणि आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना 5.11 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. हे वाटप इन्फोसिसच्या दोन कर्मचारी संबंधित योजनांतर्गत करण्यात आले आहे आणि हे वाटप गेल्या आठवड्यात 12 मे रोजी झाले. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना शेअर्स का दिले?इन्फोसिसने हे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत कारण काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल बक्षीस द्यायचे होते. याशिवाय कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मालकी हक्क थोडे वाढले पाहिजेत, अशीही इन्फोसिसची इच्छा आहे. इन्फोसिसने 14 मे रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध...
‘लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी’ या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन
पुणे

‘लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी’ या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन

हिंजवडी : 'लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी' या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी (ता. १९ डिसेंबर) मारूंजी येथील बुचडे वस्ती येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बुचडे होते. त्यावेळी मारुंजी गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्य, गावचे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक ॲड. सुभाष जौंजाळे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मान्यवरांनी खालीलप्रमाणे आपले मनोगत...