Apple iPhone 16e : अॅपल कंपनीचा स्वस्तातील आयफोन लाँच
Apple iPhone 16e launched In India : जगातील लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपल कंपनीने आयफोन १६ ई (iPhone 16e) भारतात लाँच केला आहे. तसेच खास गोष्ट म्हणजे आयफोन स्वस्तात मिळावा अशी ग्राहकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण आयफोन १६ सीरिजमधील iPhone 16e हा फोन सगळ्यात स्वस्त असणार आहे. तर भारतात लाँच झालेल्या ॲपलच्या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि तुम्ही हा कधीपासून ऑर्डर करू शकणार आहात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
डिझाइन आणि डिस्प्ले: iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे. हा डिस्प्ले 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. iPhone SE सीरिजमध्ये दिसणाऱ्या म्यूट स्विचऐवजी एक ॲक्शन बटण देण्यात आले आहे. ॲक्शन बटणद्वारे युजर्स कॅमेरा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोड ॲक्टिव्ह करू शकतात. याव्यतिरिक्त फोनमध्ये यूएसबी-सी (USB...