Tag: #jitendrabotre

मावळ तालुक्यातील महिलांच्या समस्यांबाबत भाजप महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
पुणे

मावळ तालुक्यातील महिलांच्या समस्यांबाबत भाजप महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

मावळ तालुका भाजप महिला आघाडीचे तहसिलदारांना निवेदन वडगाव मावळ, दि.१७ (लोकमराठी) - महिलांच्या समस्यांबाबत मावळतालुका भाजप महिला आघाडीच्या वतिने तहसिलदारांना निवेदन देऊन तालुक्यातील अनेक महिलांना रेशनिंग मिळत नाही, अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन अनेक पेन्शन धारकांची थांबली आहे तरी ती त्वरित चालू करावी.काही शासकीय अडचणी असतील तर त्या पूर्ण करून निराधार तसेच विधवा महिलांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी केली. मावळ तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनी मावळचे नवनिर्वाचित तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले; मावळ तालुक्यातील अनेक महिलांना रेशनिंग मिळत नाही. अनेक वेळा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तरे महिलांना मिळत असतात. अनेकदा पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यालयाशी संपर्क केला असता अधिकारी ऑफिसमध...