कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या १३ जागेसाठी ६४ उमेदवारांचे ७६ उमेदवारी अर्ज पात्र, छाननी प्रकियेत १३ अर्ज बाद
कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी सदर ८९ उमेदवारी अर्जाची छाननी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव यांनी पार पाडली. यामध्ये १३ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून ६४ उमेदवारांचे ७६ उमेदवारी अर्ज निवडणुकीस पात्र ठरले असल्याची माहिती डॉ थोरबोले यांनी दिली.
कर्जत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कर्जत नगरपंचायतीसाठी ७ डिसेंबर अखेर १७ प्रभागासाठी १०० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षण आदेशानुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कर्जत नगरपंचायतीमधील नामप्र ४ प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी डॉ अजित थोरब...