Tag: Kharalwadi

नगरसेवक समीर मासुळकर यांच्या सहकार्याने व मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नाने नवीन डीपी बॉक्स
पिंपरी चिंचवड

नगरसेवक समीर मासुळकर यांच्या सहकार्याने व मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नाने नवीन डीपी बॉक्स

पिंपरी : खराळवाडीतील पापय्या चाळ येथे गेल्या अनेक वर्षापासून खुल्या अवस्थेतील जुन्या विद्युत डीपीतून वायरिंगचा गुंता झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. त्यांना कुठल्याही प्रकाराची मदत मिळत नसल्यामुळे नागरिकांनी मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व समाजसेवक धनराजसिंग चौधरी आणि उपाध्यक्ष विशाल वाली यांच्याशी संपर्क साधला. याबाबत तत्परता दाखवत मानवता हिताय संस्थेने सदर विषयाची दखल घेत महावितरणशी संपर्क साधत नवीन डीपी बसविण्याचे काम सुरु केले. तसेच नगरसेवक समीर मासूळकर यांना निवेदन देत डीपीच्या कामासाठी लागणारी उपयोगी उपकरणे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल धनराजसिंग चौधरी यांनी नगरसेवक समीर मासूळकर व महावितरणचे अधिकारी व कामगाऱ्यांचे आभार मानले. ...