Tag: ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खरच २१०० मिळणार का; जाणून घ्या…
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना खरच २१०० मिळणार का; जाणून घ्या…

मुंबई, दि. ६ : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला २१०० रुपयांची वाट पाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (५ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरेसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत २१०० रुपये कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे. अनिल परब यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा मुद्दा सभागृहात मांडला. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीपूर्वी दोन महिन्यांचे एकत्र पैसे देण्यात आले आणि निवडणुका पार पडल्यावर निकषात बसत नसल्याचे कारण देत महिलांना अपात्र ठरवण्याचे काम सुरू आहे. तसेच २१०० रुपये कधीपासून देणार, हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही? असे प्रश्न अनिल परब यांनी...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात
मोठी बातमी, महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana (Marathi News) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता पडण्यास उशीर झाला. मात्र, मंगळवारपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “ महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान नि...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी 
महाराष्ट्र, मोठी बातमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी

मुंबई, दि. १० विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड गाजली. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरभरून मतांमुळेच महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. अशातच आता निवडणुकांनंतर पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेत बदल होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बदल करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. अशी कोणतीही अट आम्ही घातलेली नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणारच आहेत. ही योजना राबवताना आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने आणि विचार करून राबवत आहोत. त्यामुळे जे पैसे आम्ही द्यायचे ठरवले आहेत ते देणारच, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट के...
‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अ‍ॅप आ...